![]() |
| कालवश आचार्य शांताराम (बापू) गरुड, इचलकरंजी |
*प्रा. डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक कालवश आचार्य शांताराम(बापू) गरुड यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून झाली आहे. यंदाच ११ मे रोजी संस्थेच्या स्थापनेलाही पन्नास वर्षे पूर्ण होत असून हा दुहेरी औचित्य साधत समाजवादी प्रबोधिनीच्या जयसिंगपूर शाखेच्या वतीने “आचार्य शांताराम गरुड : व्यक्ती आणि कार्य” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानासाठी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. आचार्य गरुड यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी प्रेरणा देण्याचा हेतू या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. आवळेकर हॉस्पिटल येथील टेरेस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी जयसिंगपूर व परिसरातील पुरोगामी, परिवर्तनवादी कार्यकर्ते तसेच नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा