Breaking

सोमवार, ३० मार्च, २०२६

*डॉ. एस. एस.भिर्डी रंगमंदिर ; कला व सांस्कृतिक अभिमानाचे नवे केंद्र : माजी खासदार राजू शेट्टी*

 

 खासदार छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी, मिलिंद भाई शहा, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,मा.गणपतराव पाटील, आमदार अशोक माने, डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीरा अक्कोळे,नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,प्राचार्य डॉ. सुरत मांजरे 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर  : *अत्यंत संवेदनशील, प्रसिद्ध धन्वंतरी व कालवश डॉ. एस. एस.भिर्डी यांच्या नावे सुरू झालेले रंगमंदिर हे सांस्कृतिक अभिमानाचे नवे केंद्र व कला विश्वातील मानाचा तुरा असल्याचे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

      ते येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर कॅम्पस मध्ये डॉ.एस.एस.भिर्डी रंगमंदिर उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी बोलताना केले. प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्रीमंत छ. शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. भिर्डी रंगमंदिराचे उद्घाटन संपन्न झाले.

     राजू शेट्टी पुढे म्हणाले, जयसिंगपूर कॉलेजने बदलत्या काळानुसार शैक्षणिक संकुलनात    विद्यार्थी व समाज केंद्रबिंदू मानून  विविध वास्तूंची गुणवत्ता पूर्णरित्या  निर्मिती केली आहे. त्यापैकी डॉ.भिर्डी सभागृह हे त्याचा मानबिंदू ठरला आहे. आजच्या व्यावसायिक जगतात अनेक शैक्षणिक संस्था या व्यावसायिक वृत्तीने काम करीत नफा मिळवीत आहेत. अशा काळात जयसिंगपूर कॉलेजचे व्यवस्थापन  समिती ही निस्वार्थी व निरपेक्ष भावनेने काम करणारी आदर्शवत  संस्था बनली आहे.

      आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी डॉ. भिर्डी यांच्या सकल समाजोपयोगी कार्याचा लेखाजोखा मांडला. संस्थेचे विद्यार्थी व समाजमुख कार्य अधोरेखित केले. 

        डॉ. भिर्डी यांची दूरदृष्टी व त्यांची कृती ही भावी पिढी निर्माण करण्याची असल्याबाबतचे मत आमदार अशोकराव माने यांनी मांडले. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर  यांनी संस्थेबाबत गौरव उद्गार काढले.

      अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे  सचिव मिलिंद शहा वाघोलीकर यांनी जयसिंगपूर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. भिर्डी यांची कन्या प्रा.आरगे यांनी आपल्या कुटुंबाच्या भावना व्यक्त करीत संस्थेचे आभार व्यक्त केल्या. याप्रसंगी पाच लाखांचा धनादेश संस्थेला सुपूर्द केला. विकास शहा यांनी संस्थेचे अध्यक्ष जवाहरभाई शहा यांचा शुभ संदेशाचे वाचन केले.

       संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी जयसिंगपूर कॉलेज व डॉ. भिर्डी रंग मंदिराची पार्श्वभूमी मांडली. प्राचार्य सुरत मांजरे यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन  प्रा. सुनील चौगुले  व प्रा. अंजना चावरे यांनी केले.

       या कार्यक्रमास कृषी पंडित गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. आबिटकर,शिरोळचे अमरसिंह माने पाटील, नगरसेवक सचिन शिंदे, कोल्हापूरचे शेतकरी नेते भगवानराव काटे, सुभाष शेट्टी,उद्योगपती अशोक कोळेकर, शेखर पाटील, नगरसेवक  संजय पाटील, मछले मॅडम, पराग पाटील, कोळेकर वहिनी, बजरंग खामकर उपस्थित होते. डॉ. भिर्डी यांचे कुटुंबीय, बारामतीहून संस्थेचे चंद्रवदन शहा मुंबईकर, विद्युत शहा, धवल शहा वाघोलीकर, ॲड.प्रीतम व्होरा,अभिनंदन शहा, विद्याधर महामुनी विशेष करून माजी प्राचार्य डॉ. एच.एम.भालेराव उपस्थित होते.

    या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कॉलेजचे सर्व आजी-माजी प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा