Breaking

सोमवार, ३० मार्च, २०२६

*सामाजिक संवेदनशील व दानशूर व्यापारी सुभाष सारस्वत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*


 दानशूर व्यापारी सुभाष सारस्वत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रतिष्ठित व्यक्ती सुभाष शेट्टी, मा.पनपालिया, वटारे साहेब, माजी सरपंच बाबासो कारंडे 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष सारस्वत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिनी विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य भेट, हुशार व गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दत्तक योजनेद्वारे आर्थिक मदत केली आहे. दानशूर, संवेदनशील आणि समाजहिताची जाणीव जपणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या कार्याबद्दल हितचिंतकानी कृतज्ञता व्यक्त केली.

         यावेळी जयसिंगपूरातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वाभिमानी पतसंस्थेचे चेअरमन मा.सुभाष शेट्टी यांनी सुभाष सारस्वत यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत “व्यवसायासोबत समाजसेवेचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे,” असे गौरवोद्गार काढले.धरणगुत्ती गावचे माजी सरपंच बाबासो कारंडे यांनी ग्रामीण भागातील मदतकार्य, शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्य याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.प्रसिद्ध व्यापारी पनपालिया यांनी त्यांच्या उदार स्वभावाचा उल्लेख करत “संकटाच्या काळात मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष सारस्वत,” असे सांगितले.

     जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा उलघडा करीत त्यांच्या देशप्रेमी,मानवतावादी, अभ्यासू व शिक्षणप्रेमी वृत्तीचा गौरव केला, तर सामाजिक कार्यकर्ते वठारे  यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

     यावेळी जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना सुभाष सारस्वत म्हणाले,यापुढेही मी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून  समाजातील वंचित घटकासाठी समाजभिमुख व रचनात्मक काम करण्याचा संकल्प निश्चित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा