Breaking

शनिवार, २८ मार्च, २०२६

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये नूतन वास्तूंचा भव्य उद्घाटन समारंभ*



नूतन डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर कॅम्पस येथे डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर व संकुलातील इतर नूतन वास्तूंचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

     या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी खासदार राजू शेट्टी भूषविणार असून, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार छ. शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटी, बारामतीचे अध्यक्ष जवाहरशेठ शहा वाघोलीकर हे प्रमुख अतिथी म्हणून  उपस्थित राहणार आहेत.

      संकुलातील इतर नूतन वास्तूंचे उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, कृषीभूषण गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक व नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर तसेच संस्थेचे सचिव मिलिंद शहा वाघोलीकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

             या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        तरी सर्व नागरिकांनी, आजी माजी विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांनी या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक व्यवस्थापन संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी पत्रकार परिषदेतून केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा