Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

*जयसिंगपूरच्या घोडावत कन्या कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा व “अर्थविश्व” भित्तिपत्रकाचे उद्घाटन संपन्न*

 

प्रा. डॉ. एम. बी. बागुल यांच्या हस्ते भीतीपत्रक उद्घाटन संपन्न, प्राचार्य प्रा.डॉ.विकास मिणचेकर व प्रा. डॉ. संदीप रावळ 


प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक 

जयसिंगपूर : येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन सुरू असून, त्याअंतर्गत अर्थशास्त्र व बँकिंग विभागामार्फत “डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम” या विषयावर निबंध स्पर्धा व “अर्थविश्व” भित्तिपत्रकाचे उद्घाटन बुधवारी (दि. १८ मार्च २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.प्रमुख पाहुणे म्हणून चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथील प्रा. डॉ. एम. बी. बागुल व अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ. विकास मिणचेकर उपस्थित होते.

     प्रा. डॉ. बागुल मार्गदर्शन करताना म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा जागतिक तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता वाढली असून त्याचा विकसनशील देशांवर अधिक परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींतील वाढ ही सामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आखाती देशांतील तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होत असून त्याचा परिणाम भारताच्या आयात-निर्यात संतुलनावर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

           यावेळी “अर्थविश्व” या भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या निबंधांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक सीमा पाटील, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या निटवे व कुलसुम नंदगावे, तर तृतीय क्रमांक सहाना कुभार यांनी मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक समीक्षा पाटील यांना प्रदान करण्यात आले.

      प्राचार्य प्रा. डॉ. विकास मिणचेकर यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ट्रम्प यांच्या संरक्षणवादी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे निर्माण होऊन भारताच्या निर्यात क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणुकीत घट होण्याचा धोका असल्याचे सांगून आत्मनिर्भरता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे.

   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. संदीप रावळ यांनी केले.  पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रज्ञा कुलकर्णी यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. आर्या कुलकर्णी यांनी केले. 

                कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रवीण नडगे, प्रा. सोमनाथ आदर्शे व प्रा. डॉ. महादेव कदम यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा