Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

*नवोदित पत्रकार विद्यार्थ्यांची जयसिंगपूर पोलीस स्टेशनला अभ्यास भेट*


 नवोदित पत्रकार विद्यार्थी यांची पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या समवेत संवाद 


*प्रतिक्षा सरवदे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या  जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाचा भाग म्हणून जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथे भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष व प्रश्न उत्तराच्या माध्यमातून माहिती घेतली.

      पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी विद्यार्थ्यांना 2 तास वेळ देऊन अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पोलीस स्टेशनमधील विविध विभाग, गुन्हे तपास प्रक्रिया तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य करण्याबरोबर सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे याबाबत सुतोवाच केला.

   याप्रसंगी पोलीस कर्मचारी स्मिता गुजर यांनी तक्रार नोंदणी प्रक्रिया, गुन्हे तपास आणि नागरिकांशी संवाद कसा साधला जातो याविषयी मार्गदर्शन केले. सीसीटीएनएस कक्षाच्या प्रमुख प्रियांका पाटील यांनी नियंत्रण कक्षाची माहिती दिली, तर गोपनीय कक्षाचे मुजावर यांनी तर पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी  विशेष करून महिला तक्रार व आरोप पत्र याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

   या प्रसंगी कोर्स समन्वयक प्रा. डॉ.प्रभाकर माने, पत्रकार संतोष बामणे, प्रा.गणेश कुरले, पत्रकारितेचे विद्यार्थी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.तर रफिया रांगोळे यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा