Breaking

शनिवार, २१ मार्च, २०२६

*जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

 शिबिरामध्ये सहभागी झालेले वीर मंडळाचे पदाधिकारी व वैद्यकीय कर्मचारी 

 *प्राजक्ता पवार  :  विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे वीर महिला मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

            या शिबिरामध्ये सुमारे १०० ते १२० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. प्राचार्य डॉ. प्रमोदिनी पाटील, डॉ. प्रतिभा चौगुले, डॉ. समीक्षा पाटील व डॉ. निकिता मगदूम यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कोरोची येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे तसेच संजीवनी मेडिकल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    वीर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शोभा कुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सौ. राखी वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती पाटील व सौ. वैशाली पाटील यांनी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा