![]() |
| कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. शंकर गावडे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्रा. डॉ. प्रभाकर माने |
*अंजली माळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी “सामाजिक शास्त्र : संशोधन लेखन व पद्धती” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख साधन व्यक्ती म्हणून राजे रामराव महाविद्यालय जतचे प्रा. डॉ. शंकर गावडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. शंकर गावडे म्हणाले, संशोधनासाठी संशोधकाचे व्यक्तिमत्व व अनुभवाचा साठा असणे खूप महत्त्वाचे आहे, सिद्धांत निर्मितीसाठी संशोधन कसे करावे तसेच संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांचा समाज हितासाठी कसा उपयोग करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. संशोधन कार्यपद्धतीत साहित्याचा आढावा, उद्दिष्टे, गृहीतके, संशोधनाचा आराखडा, डेटा विश्लेषण आणि निष्कर्षांची मांडणी कशी करावी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी संशोधनाचे प्रकार स्पष्ट करताना सामाजिक शास्त्र आणि शुद्ध शास्त्र यांमधील फरकही स्पष्ट केला. संशोधन प्रक्रियेमधील डिस्कवरी इन्वेंशन आणि इनोवेशन या संकल्पनांवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी संशोधन पद्धती, संशोधनाची समरी कशी लिहावी आणि तिची प्रभावी मांडणी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संशोधक मार्गदर्शक हे विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात, त्यानुसार विद्यार्थ्यांनी संशोधन करून निष्कर्ष काढावेत.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. अमृता केणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. स्वप्नाली शेवाळे यांनी करून दिला. आभार कु. रेशमा पठाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा माने यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. वंदना देवकर, प्रा. विश्रांती माने, प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. ज्योती पोरे-चोपडे, प्रा. गणेश कुरले, प्रा. सत्यजित माने व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा