![]() |
| यशस्वी विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन 🌹 |
*प्रा. संदिप राजमाने : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर कनिष्ठ विभागातील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीचा एकूण निकाल ८८.७८% लागला आहे.यामध्ये विज्ञान शाखा ९५.५३%, कला शाखा ७४.७६%, वाणिज्य शाखेचा निकाल ८१.७३% इतका लागला आहे. जयसिंगपूर केंद्रात आर्ट्स मध्ये कु. हर्षवर्धन काशिनाथ नरळे (८८%) व कॉमर्स मध्ये कु. वैभवी प्रकाश कुंभार (८६%) गुणासह द्वितीय स्थानी आहेत.
विज्ञान शाखेतील गुणांनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी प्रथम-कु.मल्लिवाडे तेजस्विनी वर्धमान ८६.५०%, द्वितीय-कु.निकम अस्मिता बंडू ८१.३३%, तृतीय-कु.कांबळे गौरी दिलीप ७८.३३%.
कला शाखेतील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी प्रथम-नरळे हर्षवर्धन काशिनाथ ८८.००%, द्वितीय-कु. चव्हाण गायत्री विजय ८०.१७%, तृतीय-कु.दंडगल मंदिरा संतोष ७९.००%.
वाणिज्य शाखेतील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी प्रथम -कु.कुंभार वैभवी प्रकाश-८६.००%, द्वितीय-कु. कुलकर्णी तनुश्री प्रवीण ८२.३३%, तृतीय-गावडे आदित्य रामचंद्र ८०.३३%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे तसेच सर्व स्थानिक समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, उपप्राचार्य बी.ए.आलदर, पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे व सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा