Breaking

बुधवार, ६ मे, २०२६

*अनेकांत स्कूल मध्ये आर्ट समर कॅम्प जल्लोषात साजरा*

 

 अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विविध कलाकृतीचे प्रदर्शन 


*रफिया रांगोळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेज येथे विद्यार्थ्यांनी आर्ट समर कॅम्पमध्ये पाच दिवस उत्साहाने सहभाग घेतला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मंडला आर्ट, अंक आणि अक्षरांसोबत आकार साकारणे, स्पंज पेंटिंग, थ्रेड पेंटिंग, फिंगर  आणि थंब पेंटिंग, हँड पेंटिंग, क्ले मॉडलिंग आणि स्टोन पेंटिंग विविध पद्धतीच्या कलेच्या प्रकारांचा आनंद घेतला. पूर्वी वापरल्या जाणाऱ्या लिखाणाच्या पद्धतीची ओळख व्हावी यासाठी मुलांना बोरू आणि शाईने कसे लिहावे याची ओळख करून दिली गेली. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी मुलांनी पाण्यामध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. 

     विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य बाळकृष्ण पाटील, संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे,  अशोक शिरगुप्पे व डॉ. धवलकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. "विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये कला आणि वाचन यामुळे लक्षणीय फरक पडतो आणि त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे" असे विचार संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी व्यक्त केले. शाळेचे प्राचार्य बाळकृष्ण पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे कॅम्प मधील सहभागाबद्दल मनापासून कौतुक केले. 

          समर कॅम्प मधील विविध कलाप्रकार शाळेच्या कलाशिक्षिका साक्षी चौगुले व शिक्षिका तेजल कामाण्णा यांनी उत्तमरीत्या करवून घेतल्या. हा समर कॅम्प आयोजित करण्यासाठी शाळेचे मॅनेजर अभिजीत अडदंडे, माजी प्राचार्या प्रिया गारोळे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत पालकांचा सहभाग वाढवा यासाठी पालकांसाठीही कलेची ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हर्षदा पाटील आणि आभार सौ. पूजा निटवे यांनी व्यक्त केले. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांनी आर्ट समर कॅम्पचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा