Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

*एनएमएमएस परीक्षेत त्रिशा कुलकर्णीची राज्यात पाचवी झेप*


 त्रिशा प्रवीण कुलकर्णी हिचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मालू, प्रसन्ना कुंभोजकर, चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापक सयाजीराव पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. त्रिशा प्रवीण कुलकर्णी हिने  एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करीत राज्याच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिने या परीक्षेत तब्बल १६४ गुण मिळवत जिल्ह्यातही पाचवे स्थान मिळवले असून तिच्या या यशामुळे जयसिंगपूर शहराचा शैक्षणिक मान उंचावला आहे.

            या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व उद्योगपती राजेंद्र मालू यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर, प्रसन्न कुंभोजकर, मुख्याध्यापक सयाजीराव पाटील, त्रिशाची आई पूर्वा कुलकर्णी, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्रिशाच्या यशाचे जोरदार कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    त्रिशाच्या सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजीराव पाटील यांनी सांगितले. शाळेच्या शैक्षणिक परंपरेला साजेसी कामगिरी त्रिशाने केली असल्याची  भावना त्यांनी व्यक्त केली.

     जयसिंगपूर शहर व परिसरात त्रिशाच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा