Breaking

रविवार, १० मे, २०२६

*घवघवीत यश ; अनेकांत सायन्स अकॅडमीचा एच .एस. सी. निकाल 97 %*


 अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर 


*अंजली माळी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  येथील अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील अनेकांत सायन्स अकॅडमी मधील एचएससी विद्यार्थ्यांचा निकाल 97% लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. प्रीती पाटील 74.60% ( केमिस्ट्री 78, मॅथ्स 72) मिळवून अकॅडमी मध्ये प्रथम तर कु. पूर्वा कोठारी 73.83 % ( केमिस्ट्री 79, मॅथ्स 62, फिजिक्स 60) आणि कु. तृप्ती जाधव 70% (केमिस्ट्री 70, मॅथ्स 52, फिजिक्स 60)यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला आहे. सायन्स अकॅडमी मधील कु. मिताली चौगुले 71.67%, ज्ञानेश्वर पाटील 70.83% (मॅथ्स 89) व कु.भक्ती इंगळे 70%  यांनी उत्तम गुण मिळवून सायन्स अकॅडमीच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

       या सर्व विद्यार्थ्यांना वैभव तळंदगे,केदार पाटील,सविता कोळी,  डी. ए. पाटील, ज्योती बुरसे , रवी वाघमोरे, विश्वंभर बंडगर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनेकांत जुनियर कॉलेज चे सर्व संस्थाचालक, मॅनेजर श्री अभिजीत अडदंडे, विद्यमान प्राचार्य श्री बाळकृष्ण पाटील, माजी प्राचार्या सौ. प्रिया गारोळे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे, शिस्तपालन विभागप्रमुख सौ.शिल्पा अडदंडे , इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा