![]() |
| छ. संभाजी नगरात श्री संत सदगुरु बाळूमामा भंडारा उत्सव |
*बंडू उर्फ आनंद धायतुंडे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शहरातील नांदणी रोडवरील छ.संभाजीनगर लगत असणाऱ्या शिवसागर कॉलनी, कलावती मंदिर शेजारी, काडगे मळ्यात श्री सदगुरु संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ६ मे रोजी हा भंडारा उत्सव सोहळा साजरा होणार आहे. या भंडारा उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री हालसिद्धनाथ देवाची व श्री सदगुरु संत बाळूमामा देवस्थान आदमापुरचे भाकणूक, कथनकारचे मानकरी गुरुमाऊली कृष्णात बाबुराव डोणे (वाघापूरे महाराज) हे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे वाटपही होणार आहे.
बुधवारी सायंकाळी ४ वाजता नांदणी रोड डेबॉन्स कॉर्नर ११ वी गल्ली जयसिंगपूर येथून पालखी मिरवणूक होणार आहे. पारंपरिक सहवाद्यांमध्ये ही मिरवणूक होणार असून हा भंडारा उत्सव शहरवासीयांसाठी खास आकर्षक ठरणार आहे. सायंकाळी ६ वाजता अभिषेक व फोटो पूजन तसेच ७ वाजता श्रींची महाआरती होणार आहे. त्यानंतर ७.३० वाजता वाघापूरे महाराज यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
त्यानंतर रात्री ९ वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सोहळा होणार आहे. यासाठी सादरकर्ते शाहीर भगवान कोळेकर व शाहीर बाळू खोत उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षी देखील मोठ्या उत्साहात हा भंडारा उत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा भंडारा उत्सव साजरा करणार असल्याची माहिती या भंडारा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा