Breaking

रविवार, २१ जून, २०२६

*जयसिंगपुरात देशातील पहिल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण*

 

 जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इन्फोसिस फाऊंडेशन आणि 'स्पर्श अ हिलिंग टच' यांच्या संयुक्त विद्यमाने, सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा रविवार (दि.२१) जून रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

        या अत्याधुनिक प्रसूतिगृहाचे लोकार्पण इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रिती वैद व जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होईल. तर, विशेष 'मॉड्युलर' ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी कुर्ल्याचे तहसिलदार दिलीप रायन्नावर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती शिरोळचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर व जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व वैद्यकीय पथकाने दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा