Breaking

मंगळवार, ७ जुलै, २०२६

*नृसिंहवाडीत चालू मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा भक्तिभावात संपन्न*

 

 पहिला दक्षिण द्वारा सोहळा संपन्न 


*प्रा. चिदानंद अळोळी  : उपसंपादक*


नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे चालू वर्षातील पहिला पवित्र दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कृष्णा नदीच्या वाढलेल्या जलप्रवाहाने श्री दत्तप्रभूंच्या चरणकमलावरून दक्षिण द्वारात प्रवेश करताच ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

       या सोहळ्याची माहिती मिळताच राज्यभरातून हजारो दत्तभक्त नृसिंहवाडीत दाखल झाले. भाविकांनी कृष्णामाईत पवित्र स्नान करून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. देवस्थानतर्फे भाविकांसाठी आवश्यक सुविधा व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून श्रींची उत्सवमूर्ती प.पू. श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी विराजमान करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा