Breaking

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

*प्रामाणिक कष्टातूनच शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवते : डॉ. महावीर अक्कोळे*

 

 पालक सभेत मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्को ळे, प्रा. अप्पासाहेब भगाटे व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे 


*प्रा. संदीप राजमाने  : विशेष प्रतिनिधी*


*जयसिंगपूर  महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान प्रवेशासाठी शिक्षक-पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेश व शैक्षणिक मार्गदर्शनाच्या अनुषंगाने शिक्षक-पालक सभा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये, संस्कार आणि आत्मविश्वास जोपासणे आवश्यक असल्याचा संदेश या सभेत देण्यात आला.

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक व संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी, "प्रामाणिक कष्ट केल्यास शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांना परिपूर्ण, चारित्र्यवान आणि गुणवान बनवते. विद्यार्थ्यांनी नैतिकता, सदाचार, आत्मविश्वास तसेच भारतीय संस्कृतीची जपणूक केली पाहिजे," असे प्रतिपादन केले.

    अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या खंबीर राहून संयम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आव्हानांना सामोरे जाण्या आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही पालक व शिक्षकांची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

       प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी विज्ञान शिक्षणातील प्रात्यक्षिकांचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक व कार्यक्षम विकासासाठी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा व परिसराची माहिती दिली. 

   सभेच्या प्रारंभी उपप्राचार्य प्रा. बी. ए. आलदर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. इयत्ता अकरावीसाठी स्पेशल बॅच तसेच एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तयारीविषयी प्रा. एम. ए. शिंगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या अपेक्षा व मनोगते व्यक्त केली. 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. ए. पाटील व प्रा. पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार प्रा. एम. आर. पारीशवाड यांनी मानले. याप्रसंगी अशोक शिरगुप्पे, बिपिन खाडे व अधीक्षक संजय चावरे यांच्यासह प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा