Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२६

*अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी जवाहर शाह; सचिवपदी मिलिंद शाह*

 

 नूतन अध्यक्ष मा. जवाहरभाई शहा व सचिव मा.मिलिंदभाई शहा 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी, बारामतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी जवाहर मोतीलाल शाह (वाघोलीकर) तर सचिवपदी मिलिंद राजकुमार शाह यांची जुलै 2026 पासून पाच वर्षासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

      जुलै २०२६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बारामती विभागातून एकूण 9, तर जयसिंगपूर विभागातून 6 सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बारामती विभागातून जवाहर शाह, चंद्रगुप्त शाह, मिलिंद शाह, विकास शाह (मुंबईकर), डॉ. हर्षवर्धन व्होरा,सत्यजित शाह (पंदारकर), राहुल शाह (वाघोलीकर), सोनिक शाह (पंदारकर) यांची नियामक मंडळावर निवड झाली.

       जयसिंगपूर विभागातून डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील, डॉ. धवल पाटील, प्रा.आप्पा भगाटे आणि अभिजित अडदंडे यांची बिनविरोध निवड झाली.

         नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच नियामक मंडळावरील सर्व सदस्यांचे अर्थात संस्थेचे सर्व सदस्य, दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, रजिस्टार अभिनंदन शहा, अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक, कर्मचारी आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा