Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२६

*दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा एमफुक्टोकडून निषेध ; विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा*


महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा (एमफुक्टो) पाठिंबा

 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


मुंबई : नवी दिल्लीतील जंतरमंतर येथून संसदेकडे काढण्यात आलेल्या शांततापूर्ण विद्यार्थी मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अश्रुधुराचा मारा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर आणि लाठीचार्जच्या कारवाईचा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्टो) तीव्र निषेध केला आहे.

      NEET परीक्षेतील पेपरफुटीची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच शिक्षण व्यवस्थेतील घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. शांततापूर्ण आंदोलनावर करण्यात आलेली पोलिसांची कारवाई लोकशाहीविरोधी असल्याचे एमफुक्टोने म्हटले आहे.

     दरम्यान, उच्च शिक्षण, तरुणांचे भविष्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात हलविण्याच्या कारवाईचाही महासंघाने निषेध केला. लोकशाहीवादी चळवळी दडपण्याच्या प्रयत्नांविरोधात देशातील सर्व पुरोगामी व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन एमफुक्टोने केले आहे.

      ‘शिक्षण वाचवा, कॅम्पस वाचवा आणि देश वाचवा’ या संघर्षात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ अर्थात (एमफुक्टो) कटिबद्ध असल्याचे महासंघाचे महासचिव प्रा. डॉ. आर. के. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा