*शाहिद सय्यद : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : सन २०२५-२६ मधील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शिरोळ तालुक्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या सर्वसाधारण विजेतेपदासाठी जयसिंगपूर कॉलेजने द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल कॉलेजचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिरोळ तालुका क्रीडा अधिकारी मा. एल. जी. पवार यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाची संकल्पना राबविण्यात आली. या स्पर्धांमध्ये जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत महत्त्वपूर्ण यश संपादन केले.
या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे आणि क्रीडा शिक्षिका प्रा. अमृता पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी मा. विद्या शिरस आणि अण्णा गावडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे आणि खजिनदार पद्माकर पाटील यांनी विद्यार्थी, प्राचार्य तसेच क्रीडा विभागाचे विशेष अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा