जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या इतिहास विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सांगली येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब कोट्टलगी प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
प्रा. डॉ. बाळासाहेब कोट्टलगी मार्गदर्शन करताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित व कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्य चळवळीत महिलांनी दिलेले योगदान, त्यांचा सक्रिय सहभाग आणि त्याग याबाबत महत्वाच्या बाबी अधोरेखित केल्या.
९ ऑगस्ट हा दिवस देशभरात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने इतिहास विभागाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभागातील प्रा. डॉ. सुरज चौगुले यांनी केले, तर आभार प्रा. राजाराम कांबळे यांनी मानले.
यावेळी मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. नीतीश सावंत, डॉ. राजेंद्र कोळी, डॉ. प्रतिभा जावळे, डॉ. सुजाता पाटील, प्रा. अमर शिंदे, प्रा. किरण पाटील, प्रा. बागवान तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा