Breaking

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

जयसिंगपूर कॉलेजमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

 

ध्वजारोहण करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील,प्रा. अप्पासाहेब भगाटे, डॉ. धवल पाटील, अभिजीत अडदंडे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

        


यावेळी राष्ट्रगीत, झेंडा गीत देशभक्तीपर गीत व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. एनसीसी व स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन, तर अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी एनसीसी छात्रसैनिकांना, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी एनएसएस स्वयंसेवकांना, तर अनेकांत स्कूलचे मुख्याध्यापक पाटील यांनी स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आरडी परेडमध्ये सहभागी होऊन परतलेला एन.एस.एस. स्वयंसेवक विरेंद्र कडाळे याने ध्वजवाहकाची भूमिका बजावली.

         यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, बाळासाहेब इंगळे, डॉ. शीतल पाटील, डॉ. धवल पाटील, प्रा. अप्पासाहेब भगाटे, प्रा. अभिजीत अडदंडे, डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. महावीर बुरसे यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

         अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवकांना मोफत जिलेबी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर व अधीक्षक संजय चावरे यांनी केले. सूत्रसंचालन बाळगोंडा पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा