*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभागातर्फे सोमवार, दि.११ ऑगस्ट, २०२६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी १२० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, रक्तदान शिबिराचे आयोजन म्हणजे मानवतावादी कृती व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम होय.हे शिबिर म्हणजे युवकांना राष्ट्रीय कार्य करण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम होय.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले,हे शिबिर समाजभिमुख विचारच्या प्रेरणेने आयोजित असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाण निर्माण होईल.
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. आभार एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट सुशांत पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या वेळी विज्ञान विद्याशाखा प्रमुख, प्रा.डॉ.एस. एस. महाजन,नॅक समन्वयक प्रा. डॉ. टी. जी. घाटगे, उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे, पर्यवेक्षक प्रा.सुनील चौगुले,दिपक गवळी, संदिप लोंढे सामाजिक कार्यकर्ते शुक्राचार्य उरूणकर,प्रा. बी.ए.पाटील, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. डॉ. कबीर खराडे व मुंडे सरांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा