![]() |
| नशामुक्त समाज रॅली |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार नशामुक्त समाज जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. मांजरे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त समाजाचे महत्त्व व व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.एन.एस.एस स्वयंसेवकांनी शिरोळवाडी रोड तसेच परिसरातील विविध गल्ली-बोळांतून रॅली काढून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी “नशामुक्त समाज झालाच पाहिजे” आणि “दारू सोडा, देश घडवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
![]() |
| या रॅलीत प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. चिपरीकर उपस्थित होते. |
रॅलीमध्ये एनएसएसचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. डॉ. कबीर खराडे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा