![]() |
| सांगली- कोल्हापूर रोडवरील लॉजवर संशयास्पद मृत्यू |
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर मार्गावरील हॉटेलच्या शेजारील एका लॉजमध्ये ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.३० ऑगस्ट) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लॉज परिसरासह शहरात काही काळ खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण हा सांगली जिल्ह्यातील असल्याचे समजते. तो संबंधित लॉजमध्ये मुक्कामासाठी आला होता. लॉजमध्ये असताना अचानक त्याची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मृत तरुणाची ओळख, तो लॉजमध्ये कोणासोबत आला होता, त्याची प्रकृती अचानक का बिघडली तसेच मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास जयसिंगपूर पोलीस करीत असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा