Breaking

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

भूगोल सुधारित अभ्यासक्रमातील बदलांवर मंथन; कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 



*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए. भाग ३, सत्र ५ (NEP-2020) भूगोल विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयात करण्यात आले. सांगली, सातारा व कोल्हापूर विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधील तब्बल 190 प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

       कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. योगेश बदामे यांनी केले. यावेळी भूगोल विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, भोगावती महाविद्यालय, भोगावती यांनी बीजभाषणातून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील बदलांचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. गजकुमार माणगावे होते त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रा. निलिमा खाडे यांनी आभार मानले.

          कार्यशाळेतील विविध शैक्षणिक सत्रांमध्ये सुधारित अभ्यासक्रमातील विविध घटकांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. आर. के. चव्हाण यांनी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षण” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. डॉ. आर. एस. शिकलगार यांनी "भू-स्थानिक विश्लेषण नकाशा व प्रतिमा वाचन” या विषयातून नकाशा व प्रतिमा विश्लेषणाचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.

        प्रा. डॉ. विनोद वीर यांनी "कृषी भूगोल", तर प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांनी भारताचा "प्राकृतिक भूगोल"या विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. व्ही. पी. गायकवाड यांनी "संशोधन पद्धती" या विषयातून संशोधन पद्धती व संशोधनातील विविध विश्लेषण पद्धतींची माहिती दिली.

     दुपारच्या सत्रात डॉ. पी. टी. पाटील यांनी “भूस्थानिक तंत्रज्ञानाची मूलतत्त्वे आणि उपयोजन” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. सचिन हुदले आणि प्रा. डॉ. एस. के. माने यांनी "महाराष्ट्राचा मानवी भूगोल"या विषयावर मार्गदर्शन केले.

   कार्यशाळेच्या सांगता समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. योगेश बदामे यांनी केले. डॉ. एस. बी. गायकवाड, प्राचार्य, लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरज यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त केले. डॉ. बी. एस. जाधव, अध्यक्ष, भूगोल व भूगर्भशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यशाळेचा आढावा घेत सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

          कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सहभागी प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त करत कार्यशाळा अत्यंत उपयुक्त, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.

           कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रा. पूनम बरगाले, प्रा. स्वाती पाटील आणि प्रा. प्रज्ञा कुलकर्णी यांनी विविध सत्रांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

     या एकदिवसीय कार्यशाळेमुळे सुधारित भूगोल अभ्यासक्रमाबाबत प्राध्यापकांमध्ये सुस्पष्टता निर्माण झाली असून, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि अनुभवाधारित अध्यापनाच्या माध्यमातून सुधारित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच दिशा मिळाली, अशी भावना सहभागी प्राध्यापकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा