![]() |
| हुंड्यासाठी विवाहितेचा छळ |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : हुंड्यासाठी माहेरहून रोख रक्कम, सोन्याची चैन व चांदीचे ब्रेसलेट आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी शिवानंद बनसोडे (वय २३, मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली, सध्या रा. कोथळी, ता. शिरोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवानंद संभाजी बनसोडे (पती), अनिता संभाजी बनसोडे (सासू) आणि प्रियांका रणजीत दंडवते (नणंद), सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली, यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १० मे २०२४ रोजी विवाह झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. "तुला स्वयंपाक करता येत नाही", "तुझ्या माहेरच्यांनी लग्नात योग्य मानपान केले नाही" तसेच "प्रत्येक सणाला महागड्या साड्या आणल्या जात नाहीत" अशा कारणांवरून वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तसेच, पतीने माहेरहून सोन्याची चैन, चांदीचे ब्रेसलेट आणि ५० हजार रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा