Breaking

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

*जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात*

 

 जयसिंगपूर कॉलेजच्या  तिरंगा रॅलीत सहभागी नागरिक 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


तिरंग्याच्या सन्मानार्थ विद्यार्थी, दुकानदार व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) यांच्या वतीने तिरंग्याच्या सन्मानार्थ ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थी, दुकानदार व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

        जयसिंगपूर कॉलेज येथून सुरू झालेली रॅली शिरोळवाडी रोड, स्टेशन रोडमार्गे सिद्धेश्वर मंदिर (जयसिंगपूर नगरपरिषद) येथे पोहोचली. रॅलीत एनसीसी कॅडेट्स व एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘माझी शान, माझा अभिमान—तिरंगा’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.



           रॅलीदरम्यान पानटपरी व्यावसायिक, भाजी-फळ विक्रेते, रिक्षावाले,पोलीस,विविध दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तिरंग्याप्रती आपला सन्मान व्यक्त केला.

    प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नियोजन करण्यात आले. संस्थेचे सदस्य अभिजीत अडदंडे, उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे, पर्यवेक्षक प्रा. सुनील चौगुले, अधीक्षक संजय चावरे, एनसीसी ऑफिसर प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. खंडेराव खळदकर, प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. राजेंद्र कोरे, प्रा. डॉ. जे.के.पवार, प्रा. गणेश कुरले यांच्यासह एन.एस.एस स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

          शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.कबीर खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. सुजित मुंडे यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा