Breaking

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

देशभक्त नाथाजी लाड विद्यालयात स्वतंत्रता दिन उत्साहात संपन्न.

ध्वजारोहण करताना प्रमुख अतिथी श्रीमती अदिती लाड
व मुख्याध्यापक सचिन लाड.

विश्रामबाग - लोक शिक्षण मंडळ, सांगलीचे  देशभक्त नाथाजी लाड विद्यालयात 80 वा स्वतंत्रता दिन उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीते व विविध कवायत प्रकार सादर केले.
        कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती अदिती लाड यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्राम व सांगली मधील स्वातंत्र्य सेनानींचे योगदान सांगितले. तसेच शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
बाल विद्यार्थी भाषण सादर करताना

      स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सचिन लाड यांनी केले. यावेळी त्यांनी देशभक्त नाथाजी लाड यांची स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व शाळेची पार्श्वभूमी अधोरेखित केली.
देश सेवेनंतर शिक्षण सेवेत प्रदीर्घ सेवा केलेल्या नाथाची लाड विद्यालयात शिकणे व शिकवणे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या विचारधारेवर चालून आपले हे विद्यार्थी नक्कीच सांगलीचे व देशाचे नाव उंचावतील.
                    सचिन लाड, मुख्याध्यापक.
 
      अध्यक्षीय मनोगतात सौ. आशा लाड यांनी भारताच्या भविष्याची काळजी घेण्याचेही आवाहन विद्यार्थ्यांना केले.
     कार्यक्रमाचे आभार सौ. सारिका करांडे यांनी तर सूत्रसंचालन सौ गंगा महाले यांनी केले.
    यावेळी प्राथमिक व माध्यमिक चे सर्व शिक्षक तसेच बरेच पालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा