Breaking

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

*शिष्यवृत्ती परीक्षेत रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरचे घवघवीत यश; राज्यात ११वा, जिल्ह्यात चार विद्यार्थी झळकले*

    स्कूल कमिटीचे सदस्य प्रसन्ना कुंभोजकर,
 मुख्याध्यापक सुनील कोळी, प्रा. डॉ. प्रभाकर माने,
यशस्वी विद्यार्थी व पालक


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये कै. श्री.रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत एका विद्यार्थिनीने, तर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चार विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली.

          राज्यातील ११वा क्रमांक मिळविणाऱ्या स्वराली आदिनाथ पाटील हिने २७४ गुण मिळवून विशेष यश संपादन केले. तसेच यश अमित माने (२५८) याने जिल्ह्यात १०३वा, मृण्मयी अनुप जोशी (२५२) हिने १४२वा, चिन्मय अनुप जोशी (२४८) याने १७९वा, तर मनस्वी सुरज पाटगावकर (२४६) हिने जिल्ह्यात १८८वा क्रमांक मिळविला.

       पहिल्याच प्रयत्न स्कॉलरशिप  परीक्षेत शाळेने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक विजय सांगोले, अनिता कोळी, मुख्याध्यापक मा.सुनील कोळी तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा डॉ. दिपाली कोकरे, स्कूल कमिटीचे सदस्य मा. चंद्रकांत जाधव, मा. प्रसन्न कुंभोजकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.डॉ.प्रभाकर माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     स्कूल कमिटीचे चेअरमन मा. नितीन वाडीकर, स्कूल कमिटीचे सदस्य मा. राजेंद्रजी मालू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. प्रशांत माने तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा