![]() |
| स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी |
*प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी ऊस परिषद शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी १५ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. लवकर गाळप सुरू केल्यास अपरिपक्व उसामुळे साखर उताऱ्यावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असा दावा संघटनेने केला आहे.
साखरेचा किमान विक्री दर ५० रुपये प्रतिकिलो आणि इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. तसेच ऊस वाहतूक, वजनकाटे, साखर उत्पादनातील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
२९ सप्टेंबरला हुबळी येथे होणाऱ्या आंदोलनानंतर १० ऑक्टोबरच्या जयसिंगपूर ऊस परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा