![]() |
| अनेकांत पतसंस्थेचे चेअरमन प्रा. के. बी. पाटील, व्हाईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील व सी. ए. मुल्ला व प्राचार्य डॉ. एस. ए. मांजरे |
३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; विषयपत्रिकेवरील सर्व ठरावांना सर्वानुमते मंजुरी
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सभासदांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या येथील अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जयसिंगपूरची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन प्रा. के. बी. पाटील यांनी सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर केला.
प्रारंभी चेअरमन प्रा. के. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सभेचा उद्देश स्पष्ट केला. व्हाईस चेअरमन प्रा. पी. सी. पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये विशेष करून पतसंस्थेने सलग १७ वर्ष अ वर्ग चे ऑडिट प्राप्त केले आहे. व्यवस्थापक राहुल पाटील यांनी विषयपत्रिकेवरील विविध विषय सभेसमोर मांडले. यावेळी सभासदांनी सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली.
संस्थेच्या वाटचालीत योगदान देणारे माजी प्राचार्य प्रा. पी. बी. बापट, सी. ए. मुल्ला, मुलाणी, अण्णासाहेब पाराज व राऊत व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. पी. बी. बापट व सी. ए. मुल्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सभेस प्रा. ए. टी. चौगुले, प्रा. जी. बी. चौगुले, प्रा. एस. बी. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेस संस्थापक संचालक डॉ. सुभाष अडदंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच तज्ज्ञ संचालक अभिजीत अडदंडे, महावीर पाटील, संजय चावरे, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, संचालक प्रा. एम. एस. पाटील, सुहास हिरुकडे, प्रदीप सुतार, सुनील कणसे व हिरालाल पवार उपस्थित होते.
सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे संपूर्ण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले यांनी आभार मानले. सभा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक राहुल पाटील, कॅशियर सुधाकर पाटील, कुबेर गायकवाड व मंदाकिनी बोटांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा