विश्रामबाग - येथील डिस्कवरी लर्निग सेंटर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपक्रमशील शिक्षक व लेखक श्री जगदीश काबरे यांचे गणिताच्या गमती जमती या विषयावर कार्यशाळा पार पडली.
सर्वांना अवघड वाटणारा गणित विषय कसा सोपा व मजेशीर आहे याचे अनेक प्रात्यक्षिके जगदीश काबरे सर यांनी घेतली. गणिताविषयी असलेली भीती क्षणात दूर करता येतात याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सोबतच आपले आयुष्य कसे गणितमय आहे याची अनेक उदाहरणे दिली.
![]() |
| जगदीश काबरे यांचे स्वागत करताना सुनील माळी सर |
श्री जगदीश काबरे फक्त गणितच नाही तर विज्ञान देखील सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्यांच्या अनेक विज्ञानकथा देखील प्रकाशित झाल्या आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रा. रघुनाथ मगदूम ( कदम - पाटील ) यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षक कसा समाज घडवणारा पाया आहे हे अधोरेखित केले. अन्य क्षेत्रातील मान्यवरांकडून ही छोटी व क्षणिक असू शकते पण शिक्षकांकडून झालेली चुक ही अनेक पिढ्यांची ठरू शकते, त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला परिपूर्ण व जबाबदार व्यक्ती केले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.
![]() |
| प्रा.रघुनाथ मगदूम यांचे स्वागत करताना शमा पठाण मॅडम |
यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा