![]() |
| आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांचा सन्मान करताना सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
दोन्ही गटांत प्रथम क्रमांक; शील्ड, प्रमाणपत्र व रोख रकमेने सन्मान
जयसिंगपूर : रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटी व भुपाल अण्णा विभुते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूरचा विद्यार्थी कु.रविराज प्रभाकर माने याने इयत्ता ५ वी ते ७ वी गटात प्रथम क्रमांक व तृतीय स्थान कु. सई फडणीस हिने पटकावला. तसेच इयत्ता ८ वी ते १० वी गटात सिद्धी माने हिने प्रथम क्रमांक मिळवून वक्तृत्व स्पर्धेत मालू हायस्कूलचे नावलौकिक निर्माण केले.
विजेत्या विद्यार्थ्यांचा रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीच्या वतीने रोटे डॉ.मोनिका कुल्लोळी,रोटे राजेश सानिकोप,रोटे विभुते,रोटे खामकर यांच्या हस्ते शील्ड, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचे अध्यक्ष खामकर, भुपाल अण्णा विभुते चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा विभुते,रोटे डॉ.अतिक पटेल तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सयाजीराव पाटील, पर्यवेक्षक सतिश चिपरीकर तसेच शिक्षिका ठोमके मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र मालू, प्रसन्न कुंभोजकर,चंद्रकांत जाधव, सर्व संचालक, शाळा, शिक्षक, पालक व सर्वं स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा