![]() |
| जयंत आसगावकर |
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; कोल्हापूर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण
प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर, दि. ३ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेनंतर आसगावकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काँग्रेसने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित गोविंदराव वंजारी, तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची उमेदवारीही जाहीर केली आहे
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केले जात असून, निवडणुकीच्या तयारीला आता वेग येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा