Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२६

*प्रजासत्ताक दिन शिबिर निवड चाचणीसाठी ; शिवाजी विद्यापीठाचा NSS संघ छ. संभाजीनगरला रवाना*


 संचालक डॉ. कबीर खराडे, सुजीत मुंढे व स्वयंसेवक विद्यार्थी 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन (NRD) व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन (SRD) शिबिरासाठीच्या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा एन.एस.एस. संघ छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे दि. १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे निवड शिबिर होणार आहे.

       या संघाचे नेतृत्व जयसिंगपूर कॉलेजचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने आणि देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील  प्रा. डॉ. सौ. वर्षा खुडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. निवड शिबिरासाठी संघातील विद्यार्थी आवश्यक तयारीनिशी रवाना झाले आहेत.

         या निवड चाचणी शिबिरात विद्यार्थ्यांची ड्रिल मार्चिंग, मुलाखत, सांस्कृतिक कलागुण आणि एकूण व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या निकषांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचे संघ सहभागी होणार असून, राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी गुणवंत स्वयंसेवकांची निवड करण्याच्या दृष्टीने या शिबिराला विशेष महत्त्व आहे.

           या उपक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले आहे. तसेच एन.एस.एस. संचालक प्रा. डॉ. कबीर खराडे आणि सुजीत मुंढे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. श्लोक वरुडे, श्वेताली निकम आणि अनिकेत पाटील यांनीही या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा