Breaking

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

*राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे देशाचे खरे सामाजिक सैनिक : अजय शिंदे*

 

 शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. अजय शिंद, कुलगुरु डॉ. विजय फुलारी, डॉ. मिलिंद काळे, कुलसचिव डॉ. संजय कवडे, संचालक डॉ. सोमीनाथ खाडे 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*



छत्रपती संभाजीनगर : विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांमध्ये उत्तम शिस्त, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्तीची जाणीव आणि नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे देशाचे खरे सामाजिक सैनिक असून, समाजातील अंधश्रद्धा दूर करणे, सामाजिक प्रश्न हाताळणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करणे ही त्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे अजय शिंदे यांनी केले.

     ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन पूर्व निवड चाचणी शिबिरात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी  व राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र शासन डॉ. मिलिंद काळे उपस्थित होते.

      ते पुढे म्हणाले,राष्ट्रीय छात्र सेनेप्रमाणेच राष्ट्रीय सेवा योजना अधिक सक्षम होणे आवश्यक असून, युवकांना सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेतृत्व विकसित करण्याची मोठी संधी मिळते. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि विविध सामाजिक समस्यांविरोधात जनजागृती करताना स्वयंसेवकांनी संवेदनशीलता आणि विवेकाची भूमिका घेण्याबाबत विचार व्यक्त केले.

     कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विकसित भारत हा अधिक सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना ही संघटना अधिक प्रभावी पणे सामाजिक उपक्रम राबवत असल्याबाबत विचार  व्यक्त केले.

     याप्रसंगी राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र शासन डॉ.मिलिंद काळे,कुलसचिव डॉ. संजय कवडे, प्रा. रमेश देवकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोमीनाथ खाडे,संचालक डॉ. शितल सोळंके, संचालक  डॉ. सुशील शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

      डॉ. सोमीनाथ खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आभार डॉ. डॉ. अनंत कणगरे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन कळलावे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा