![]() |
| साहित्यिक विचारवंत प्राचार्य डॉ.श्रीपाल सबनीस व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*
मुबंई : साहित्यातून समाजाची दुःख मांडू शकतो समाजाच्या प्रश्नांचा आलेख साहित्यातून दर्शवू शकतो आणि समाजाची दुःख मांडण्यासाठी आपल्या लेखणीचा पुरेपूर वापर करू शकतो तसेच समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवू शकतो म्हणून लेखणी हे समाज प्रबोधनाचे व परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राचार्य डॉ.श्रीपाल सबनीस यांनी मुंबई येथे मांडले.
भारतीय सारस्वत मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलनामध्ये संमेलन अध्यक्ष म्हणून श्री सबनीस बोलत होते. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की साहित्यिकाला समाज मन वाचता आले पाहिजे साहित्य हा समाजाचा आरसा असून समाजाच्या दुःखाचं प्रतिबिंब हे साहित्यात दिसायला हवे तरच साहित्य समाजाभिमुख मानता येईल तसेच साहित्याची खरी ओळख ही त्याच्या सामाजिक अधिष्ठानावर अवलंबून असते म्हणून समाज मनाचे भान ठेवून आपल्या लेखणीला लिहिते करावे असेही ते म्हणाले . ते पुढे असेही म्हणाले की गावोगावी छोटी छोटी साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे,ती झाली तर मे मराठीची सेवा चांगल्या पद्धतीने होईल.
कार्यक्रमाचे उद्घाटक लोककलेचे गाडी अभ्यासक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की लोककलेला समाजामध्ये चांगले दिवस येण्यासाठी लोककलेचा प्रसार प्रचार होण्यासाठी मराठी भाषेचा विकास होण्यासाठी चांगले साहित्यिक निर्माण होणे गरजेचे आहे साहित्य सेवा ही समाजाची खरी सेवा असून लोककला हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे या माध्यमाच्या जोरावर समाजाच्या मनाचा ठाव घेता येईल आणि लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करता येईल म्हणून साहित्यिकांनी आपली लेखणी प्रभावीपणे वापरली पाहिजे आणि लेखणीला मनाचे स्थान मिळवून दिले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजाचा साहित्य सामाजिक आणि वैचारिक विकास होईल कला माणसाला जगण्याची प्रेरणा देते म्हणून कलेला वाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी अशी संमेलने ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर लालासाहेब बनसोडे म्हणाले की समाजाची गरज ही साहित्यातून निर्माण होणाऱ्या चांगल्या कलाकृतीतून भागू शकते म्हणून साहित्यिकांनी आपली कला प्रभावीपणे मांडावी आणि समाजाची सेवा करावी समाज मनाचे भान ठेवून समाजाच्या कल्याणासाठी आपल्या लेखणीचा वापर करावा यावेळी बोलताना डॉ.संजय पवार म्हणाले की मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळाला असून मराठी साहित्य जगात पोचवण्यासाठी मराठी लिहिणाऱ्या साहित्यिकांनी आपले साहित्य प्रभावीपणे मांडावे आणि मराठीला जागतिक पातळीवर पोहोचवावे मराठी मातृभाषा असून या मातृभाषेची सेवा आपण सर्व मराठी साहित्यिकाने प्रामाणिकपणे करावी आणि मराठी साहित्य दर्जेदारपणे निर्माण करावे त्या साहित्याला जागतिक पातळीवर नेण्यात यावे सध्याचे योग हे प्रसिद्धीची योग असून मराठी भाषेला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि आपले साहित्य जगापुढे मांडावे तरच मराठी भाषा तग धरून राहील आणि तिला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळेल
यावेळी बोलताना संयोजन समितीच्या प्रमुख वाणी किरकलमट्टी म्हणाल्या की या साहित्य संमेलनाच्या आयोजन हे मराठी कवी लेखक यांच्या साहित्याला प्रेरणा देण्यासाठी करण्यात आले असून मराठी साहित्य हे सर्व दूर नेण्यासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल
यावेळी स्स्वागत व प्रास्ताविक करताना भारतीय सारस्वत मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश सकटे म्हणाले की भारतीय सरस्वत मंडळाच्या वतीने मराठी साहित्यिकांना त्यांच्या साहित्याला व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करण्यात येईल चांगल्या साहित्याला सर्वदूर नेण्याचे काम मराठी भाषेची सेवा करण्याच्या करणाऱ्या साहित्यिकाला भारतीय सारस्वत मंडळ सर्वतोपरी सहकार्य करून त्यांचे साहित्य जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करेल तसेच या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उपेक्षित साहित्यिकांना आपले साहित्य जगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे काम भारतीय सारस्वत मंडळ करेल
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन माननीय आमदार मोरोजी पटेल संमेलन अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस तसेच समितीच्या प्रमुख वाणी केरकलमट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात ग्रंथ दिंडी संपन्न झाली या ग्रंथदिंडी करिता सर्व साहित्यिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन विद्या थोरात काळे यांनी केले तर स्वागत प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुरेश सकटे यांनी केले.
संमेलनाचे संयोजन वाणी केरकलमट्टी ,मंगेश रेड्डी, डॉ. अर्चना रेंदारकर,स्वाती मसुरकर,सुनीता परब,चारुशीला बिडवे, दीपक करंगुटकर, भास्कर डिकवलकर,शामराव सुतार, करून यशस्वी केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा